गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल “नादाला वय लागत नाही” January 12, 2025 by akshay1137 old man dance सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा View this post on Instagram A post shared by (@all_top_sounds_updates_) उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता अक्षरश: डीजेच्या बेसवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच सर्वांचं लक्ष या आजोबांकडे जातं. ‘तुम्हा बघून तोल माझा गेला’ गाण्यावर आजोबांनी खतरनाक डान्स केला आहे. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.