व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
टायरचा स्फोट झाल्याने मेकॅनिक हवेत फेकला गेला आणि खाली पडला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अब्दुल रशीद (१९) असे मेकॅनिकचे नाव आहे, तो कोटेश्वरजवळील NH66 वर असलेल्या पंक्चरच्या दुकानात टायर दुरुस्त करत होता.
हवा भरताना टायर फुटला…
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
हवा भरताना टायर फुटल्याने एक माणूस हवेत फेकला गेला
हा व्हिडीओ १३ सेकंदाचा आहे, ज्यामध्ये दुकानासमोर स्कूल बस उभी असल्याचे दिसत आहे. एक तरुण बसचा टायर दुरुस्त करून त्यात हवा भरत आहे. हवा भरल्यानंतर तो तिथून दूर जाऊ लागताच टायर फुटतो. हा स्फोट इतका शक्तिशाली आहे की, धुराच्या ढगाबरोबरच ती व्यक्ती काही इंच हवेत फेकली जाते आणि जोरात जमिनीवर कोसळते. आवाज ऐकून लोक त्याच्या मदतीला धावतात आणि त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जातात. या अपघातात मेकॅनिकच्या हाताला दुखापत झाली आहे.